Actor Shahid Kapoor | ‘लग्न फक्त एका गोष्टीसाठी केले जाते ते म्हणजे पुरुषांचे आयुष्य…; शाहिद कपुरचे लग्नाबद्दल हे विचार ऐकून व्हाल धक्क !

पोलीसनामा ऑनलाइन – Actor Shahid Kapoor | आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेता शाहिद कपूरने (Actor Shahid Kapoor) कित्येक वर्षे बॉलीवुडमध्ये (Bollywood) काम करुन स्वत:चे प्रबळ स्थान निर्माण केले आहे. शाहिद हा त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. 2015 साली शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे लग्न बंधनात अडकले. हे कपल सोशल मीडियावर खूप ॲक्टीव असून त्यांचे फोटो खूप व्हायरल होत असतात.
अनेकदा शाहिद त्याच्या बायकोबद्दल व वैवाहिक जीवनाबद्दल चांगले बोलताना दिसतो. मात्र नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तो ट्रोल होत आहे. या मुलाखतीमध्ये शाहिदचे लग्नाबद्दलचे व खास करुन स्त्रियांबद्दलच्या वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेक जण धारेवर धरत आहे. (Shahid Kapoor Troll)
एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल बोलताना शाहिद कपूर म्हणाला की, “लग्न फक्त एका गोष्टीसाठी केले जाते ते म्हणजे पुरुषांचे आयुष्य विखुरले आहे आणि स्त्री ते नीट करण्यासाठी आली आहे. जेणेकरून त्याचे उर्वरित आयुष्य स्थिर आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून गुजरेल आणि आयुष्य हेच आहे.”
लग्नाबाबत शाहिद कपूरचे हे विचार नेटकऱ्यांना अजिबात पटलेले नाहीत. अनेकांनी कमेंट करत त्याच्या या विचारांवर जहरी टीका केली आहे. एका नेटकऱ्यांने लिहिले आहे की, “तुम्ही कबीर सिंगची (Kabir Singh) भूमिका केली आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खऱ्या आयुष्यातही त्याच्यासारखे वागावे.”
शाहिदची गाजलेली भूमिका कबीर सिंग याचा संदर्भ घेत सर्वांनी त्याला ट्रोल केले आहे.
कबीर सिंग या व्यक्तीरेखेचे स्त्रियांसोबतचे वर्तन अतिशय वाईट व निंदनीय होते.
मात्र लग्नाविषयीचे शाहीदचे विचार अनेकांना पटले नसून स्त्रिया पुरुषांचे आयुष्य सुधारण्यासाठी नाहीत असे
मत मांडले आहे. व्हिडिओवर टिप्पणी करताना एकाने म्हटले की, “ठीक आहे, चित्रपटात तू कबीर सिंगची भूमिका
केली आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू खऱ्या आयुष्यातही त्याच्यासारखा वागशील.” आणखी एका युजरने
लिहले की, “त्याने कबीर सिंगची भूमिका केली कारण तो तसा होता.” तसेच “स्त्रिया पुरुषांना सुधारण्यासाठी
असतात का?” असा प्रश्न एका युजरने केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, “पुरुषांना सुधारणे हे महिलांचे काम नाही.
लग्न ही पती-पत्नी दोघांचीही समान जबाबदारी आहे.”
शाहिद कपूरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
मीरा आणि शाहिदचं नातं ही अनेकांना मनापासून भावतं मात्र, शाहिदचे (Actor Shahid Kapoor) लग्नाबद्दलचे
हे विचार ऐकून आश्चयाचा धक्का बसला. त्यामुळे अनेकांनी त्याला तिखट शब्दांत फटकारले असून तो आता
सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Web Title : Actor Shahid Kapoor | bollywood actor shahid kapoor brutally trolled for his opinion on marriage
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा