अभिनेता शाहिद कपूरचे सावत्र वडिल राजेश खट्टर बनले बाप ! शेअर केला मुलासोबतचा सुंदर फोटो

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही अ‍ॅक्टर राजेश खट्टर यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांचा मुलगा वनराज याचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा मुलगा वनराज गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जन्माला आला होता. राजेश खट्टर यांनी आता कुठे मुलाचा फोटो शेअर केला आहे. ज्या दिवशी त्यांची आणि पत्नी वंदना संजानी आणि त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती त्या दिवशी त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक छानसा मेसेजही दिला आहे.

राजेश खट्टरनं इंस्टारून फोटो शेअर करत लिहिलं की, “सर्व अद्भुत लोकांना माझं पहिल्यांदा हॅलो. पप्पा सांगत आहेत की, जग आता कठिण काळातून जात आहे. परंतु हाही काळ जाईल आणि तुम्ही सर्व आम्हा मुलांसाठी या दुनियेला आधीपासून जास्त सुंदर बनवणार आहात. आम्ही सर्व मुलं या वायद्यासाठी तुमचे आभार मानतो.” या पोस्टमध्ये त्यांनी सर्वांना घरात राहण्यसाठी आणि सुरक्षित राहण्यासाठीही सांगितलं आहे.

राजेश खट्टर यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अॅक्ट्रेस कविता घईनं लिहिलं की, ईश्वर तुम्हाला कायमच आनंदी ठेवो. अनेरी विजयनं लिहिलं की, तुम्हा दोघांना हॅप्पी अॅनिव्हर्सरी.

राजेश खट्टर हे बॉलिवूड स्टार ईशान खट्टरचे वडिल आणि शाहिद कपूरचे सावत्र वडिल आहेत. राजेशनं शाहिद आणि ईशानची आई अ‍ॅक्ट्रेस निलिमा अजीम सोबत 1990 मध्ये लग्न केलं. 2001 पर्यंत दोघंही सोबत राहिले. यानंतर 2008 साली त्यांनी वंदना सोबत लग्न केलं.