अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या ‘सिक्रेट टॅटू’ची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ ! आता आला समोर

पोलिसनामा ऑनलाइन –अनेक फिल्म स्टार्स असे आहेत जे काही ना काही कारणानं चर्चेत येताना दिसत आहेत. अलीकडेच बॉलिवूड स्टार शाहिद कपूर याची पत्नी मारी राजपूतची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसली. याचं कारण म्हणजे मीराचा सिक्रेट टॅटू आहे जो आता समोर आला आहे.

मीरा राजपूतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. फोटो तसा तर जुना वाटत आहे परंतु सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे. फोटोत मीरानं साडी नेसली आहे आणि पोज देत आहे. मीराच्या पाठीवर डाव्या बाजूला एक कमळाचा टॅटू आहे. ही मीराचा सिक्रेट टॅटू असल्याचं सांगितलं जात आहे.

चाहत्यांनाही मीराचा टॅटू आणि तिची साडीतला लुक खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या सिक्रेट टॅटूटचा फोटो सोशलवर शेअर केला आहे. अनेक चाहतेही कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहे. मीराची फॅनफॉलोविंगही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही.

दोन मुलांची आई असणाऱ्या मीरानं अनेक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. काह इव्हेंटमध्ये ही मीरा शाहिदसोबत दिसत असते. तिला आपल्या फॅशन सेंससाठी अनेकदा कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आहेत.