अ‍ॅक्टर आणि CINTAA चे सदस्य शिवकुमार वर्मा व्हेंटिलेटरवर ! सिंटानं मागितली सलमान, अक्षय, अमिताभकडे आर्थिक मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्टर आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) चे सदस्य शिवकुमार वर्मा क्रॉनिक ऑब्सट्रेक्टिव्ह पल्माेनरी डिजीज (CODP) सोबत लढा देत आहेत. हा एक फुफ्फुसांचा आजार आहे. असं सांगितलं जात आहे की, शिवकुमारची हालत नाजूक आहे. सध्या ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. शिवकुमार आणि त्यांचं कुटुंब त्यांचा खर्च करण्यासाठी असमर्थ आहेत.

CINTAA नं मागितली शिवकुमारसाठी आर्थिक मदत
CINTAA नं शिवकुमार यांंच्या आर्थिक मदतीसाठी बॉलिवूड सेबेल्सला साद दिली आहे. असोसिएशननं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शिवकुमार वर्मा यांच्या स्थितीविषयी सांगितलं आहे आणि सलमान खान, अनिल कपूर, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि सनी देओल यांना टॅग केलं आहे. सोबतच सामान्य जनतेसाठी त्यांनी शिवकुमार यांचे बँक डिटेल्स दिले आहेत जेणेकरून लोक त्यांची मदत करू शकतील. त्यांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

असोसिएशननं अनेकदा ही पोस्ट शेअर केली आहे आणि वेगवेगळ्या सेलेब्सला टॅग केलं आहे. CINTAA चे अमित बहल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, शिवकुमार वर्मा असोसिएशनचे अ‍ॅक्टिव्ह मेंबर आहेत. CINTAA ला त्यांची स्थिती कळाल्यानंतर त्यांनी अ‍ॅक्टरच्या खात्यात 50 हजार टाकले आहेत. त्यांच्या मते शिवकुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या उपचारांसाठी 3-4 लाखांचा खर्च येणार आहे. वर्मा यांच्या मुलीनंही CINTAA ला मदतीसाठी साद घातली आहे.

शिवकुमार यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी अजय देवगण स्टारर हल्ला बोल सिनेमात काम केलं आहे. याशिवाय त्यांनी बाजी जिंदगी की सिनेमातही ते दिसले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांतही काम केलं आहे.