ढाई किलो का हाथ मोदी के साथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रवेशानंतर सनी देओलने आपल्या भावना व्यक्त केल्या. जसे माझे वडिल, अटल बिहारी वाजपेयीसोबत जोडले गेले होते तसाच आता मीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जुडणार आहे.” असे सनी देओल म्हणाला.

सनी देओल म्हणाला की, “जसे माझे वडिल, अटल बिहारी वाजपेयीसोबत जोडले गेले होते तसाच आता मीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुडण्यासाठी आलो आहे. देशाला मोदींसारख्या नेतृत्त्वाची गरज आहे. मी जास्त काही बोलणार आहे. मला जे काही करायचं ते मी माझ्या कामातून दाखवेलच. मी बोलण्याऐवजी माझे कामच बोलेल.” असे सनी देओल म्हणाला.

सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसने सुनील जाखड यांना उमेदवारी दिली होती. जाखड यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता विनोद खन्ना यांनी गुरदासपूर येथून विजय मिळवला होता. २७ एप्रिल २०१७ रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटीनिवडणुकीत जाखड यांनी विजय मिळवला होता. याच मतदारसंघातून २०१४ च्या आधी विनोद खन्ना 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

यानंतर पुन्हा एकदा भाजपाने याच मतदारसंघातून एका अभिनेत्याला मैदानात उतरवले आहे. सनी देओल यांची सावत्र आई हेमा मालिनी यांनाही मथुरा येथून भाजपाने तिकीट दिलं आहे. धर्मेंद्रही त्यांच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यावेळी उपस्थि होते. काही दिवसांपूर्वी सनी देओल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटला होता. त्यानंतर त्याच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर आता सनी देओलने भाजपात प्रवेश केला आहे.