सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका; आता प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना हरियाणा इथल्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फरीदाबादच्या एशियन रुग्णालयात दाखल केलंय.

सुशांत सिंह रजपूतने मुंबईच्या त्याच्या घरात 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. यामुळे चित्रपटसृष्टी हादरली होती. याचा मोठा धक्का त्यांच्या परिवाराला बसला होता. सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सीबीआय, एनआयबी सारख्या संस्थाही सामील झाल्या आहेत. तसेच या संस्था या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सुशांतचे वडील केके सिंह सुरुवातीला बिहारमध्ये राहत होते. पण, सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर ते फरीदाबादमध्ये राहू लागले. सोशल मीडियावर सुशांतच्या वडिलांचे रुग्णालयातलं छायाचित्र शेअर झालेत.त्यानंतर हे वृत्त बाहेर आले आहे. या फोटोत सुशांतचे वडील हॉस्पिटलच्या बेडवर आहेत. मुलगा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते अजूनही सावरले नसल्याचं सांगितलं जात आहे.

छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सर्वप्रथम के.के. सिंह यांचा फोटो समोर आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फरीदाबादच्या एशियन रुग्णालयात दाखल केलंय. सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. सिंग यांची हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर सुशांत सिंह रजपूतचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना करत आहेत.

सुशांत सिंह रजपूतने 14 जूनला केली होती आत्महत्या
14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह वांद्र्यातील घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत होते. त्यावेळी यात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. सोशल मीडियावरील बहुतेक अकाऊंट फेक होती, असा खुलासा मुंबई सायबर पोलिसांनी केलाय.