अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

ठाणेः पोलीसनामा (Policenama news marathi) ऑनलाइन – actor ujjwal |स्वराज्यरक्षक संभाजी ( Swarajya Rakshak Sambhaji ) या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल धनगरचे (Ujwal Dhangar) (वय 29) याचे सोमवारी (दि. 28) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने टिटवाळा येथील रुग्णालयात निधन झाले. त्याच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकारांनी उज्वलला श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वांना हसवणारा कलावंत हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

उज्वल हा शनिवारी क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेचे शूटिंग संपवून घरी आला होता. सोमवारी सकाळी 6 वाजता अचानक त्याच्या छातीत व पोटात दुखू लागले. त्यामुळे तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात गेला. तेथे डॉक्टरांशी बाेलून ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते म्हणून गोळी घेऊन घरी परतला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने ताे आई-वडिलांसाेबत महागणपती रुग्णालयात दाखल झाला. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी लावल्यानंतर तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टिटवाळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.

2008 मध्ये उज्वलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले हाेते.
त्याने मराठी रंगभूमीवर चित्रपट अन् मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
मूळचा सापगाव (ता. शहापूर) येथील रहिवासी असलेला उज्ज्वल हा गेल्या 15 वर्षापासून टिटवाळा येथे राहत होता. उज्वलने स्वराज्यरक्षक संभाजी, ‘लक्ष्य, क्राईम पेट्रोल या सारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : actor ujjwal dhangar dies heart attack

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Pune Police News | पुण्यातील पोलिस ‘हायटेक’ ! पोलिसानं सहकार्‍याकडूनच घेतली ‘फोन पे’व्दारे (PhonePe) लाच

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी