‘कोरोना’च्या रिपोर्टबाबत जेनेलियानं केला 21 दिवसानंतर खुलासा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियानंतर जेनेलिया देशमुखच्या घरात देखील कोरोनानं शिरकाव केला होता. तीन आठवड्यापूर्वी जेनेलियाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा एकादा 21 दिवसांनी चाचणी केल्यावर निगेटिव्ह आल्याची माहिती जेनेलियानं ट्विट करुन आपल्या चाहत्यांना दिली आहे.

अभिनेते रितेश देशमुख याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना 21 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत:ला तीन आठवडे क्वारंटाईन केलं होतं. 21 दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर कुटुंबात परतण्याचा आनंद खूप मोठा असल्याची माहिती जेनेलिया देशमुख यांनी ट्विट करून दिली आहे.

जेनेलिया देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देवाच्या कृपेने कोरोनाचा रिपोर्ट 21 दिवसांनी निगेटिव्ह आला. तुमच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादानं लवकर बरी झाले. 21 दिवस क्वारंटाईन राहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. आपल्यावर प्रेम करणारी माणसं आणि कुटुंब हे आपली ऊर्जा, क्षमता वाढवण्यासाठी कायम मदत करत असतात. मी कोरोनाला हरवून पुन्हा माझ्या कुटुंबात आले याचा मला खूप आनंद असल्याचे, जेनेलियानं ट्विटमध्ये म्हटले आहे.