शुटींगसाठी मुंबईहून बिहारला गेलेल्या कलाकारांना ‘माराहण’, अभिनेत्री झाली बेशुद्ध, क्रू मेंबर्सची रुग्णालयात धाव !

पोलिसनामा ऑनलाइन –सिनेमाच्या शुटींगासाठी मुंबईतून बिहारला गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळं तिकडेच अडकेलल्या कलाकारांसोबत आणि क्रू मेंबरसोबत धक्कबुक्की झाल्याचं समजत आहे. सदर कलाकार बिहारमधील शाळेत थांबले होते. हे पाहून अ‍ॅक्ट्रेस प्राची सिंह हिची तब्येत अचानक बिघडली. सोबतचा लोकांनी तिला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी तिला प्राथमिक उपचार देत हायर सेंटर रेफर केलं होतं.

इश्क दीवानाची सुरू होती शुटींग

समोर आलेल्या माहितीनुसार, इश्क दीवाना या सिनेमाची शुटींग सुपौलच्या पिपरा ठाण्यातील रतौली गावात सुरू होती. यासाठी 65 लोकांची टीम रतौलीला आली होती. लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर त्यांनी शाळेत आश्रय घेतला होता.

धक्काबुक्कीच्या घटनेबद्दल बोलताना क्रूमधील लोकांनी सांगितलं की, स्थानिक सुशील सिंह आणि सिंटू सिंह स्कुलमध्ये येऊन युनिटमधील मुलींचा व्हिडीओ तयार करत होते. विरोध केल्यानंतर त्यांनी माराहण केली. महिलांनाही धक्काबुक्की केली. डायरेक्टर आणि अ‍ॅक्टर मनोज आर पांडे मध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबतही गैरवर्तन केलं. हे सगळं पाहून प्राची सिंह बेशुद्ध झाली होती. युनिटनं तिला आनन फाननमध्ये उपचारासाठी पीपरा पीएचसी ला आले होते.

पोलिसात गेलं प्रकरण

दरम्यान हे प्रकरण आता पोलिसात गेलं आहे. पोलिसांनी सांगितलं की प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.