‘या’ अभिनेत्रीला रिस्क घेणं आवडतं, डेब्यू सिनेमात बनली होती ‘भूत’, आगामी सिनेमात बदललं ‘जेंडर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अदा शर्मा आपल्या लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. अदा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अलीतडेच अदा शर्मा तिनं साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलली आहे. रिस्क घ्यायला मला आवडतं असं अदानं सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

अदा शर्मा म्हणाली, “1920 हा माझा पहिला सिनेमा होता. एका भयानक मुलीची भूमिका साकारणं खूप रिस्की होतं. पहिल्याच सिनेमात प्रेक्षक मला काळे दात आणि विस्कटलेले केस अशा अवतारात पहात होते. मला प्रत्येक प्रकारची रिस्क घेणं पसंत आहे.”

अदाला खरंच सिनेमात रिस्क घेताना दिसते. कारण 1920 मध्ये तिनं खूप वेगळी अशी भूताची भूमिका साकारली होती. कमांडो सिनेमात ती अॅक्शन करताना दिसली. याशिवाय आता ती आगामी सिनेमात एका पुरुषाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पुढे बोलताना अदा म्हणाली, “कमांडो 2 केला तेव्हाही एक रिस्क होती. तुम्ही तेलगू उच्चारासोबत कोणाला हिंदी बोलताना ऐकलं नसेल. कमांडो 3 मध्येही त्यांनी मला कंटिन्यू केलं. मुलगी म्हणून मी स्वत:ला लकी समजते की, मी भारतातल्या सर्वात मोठ्या अॅक्शन फ्रेंचायजीचा हिस्सा आहे.

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती आगामी सिनेमा मॅन टू मॅन मध्ये काम करतना दिसणार आहे. अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008 साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. अदानं कमांडो 2, हंसी तो फंसी या सिनेमातही काम केलं आहे.