‘अदा’च्या अदांनी चाहते ‘क्लीन बोल्ड’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अदा शर्मा आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे अदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अदानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होत जे सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये तिचे बॉडी पेंट केलेले फोटोही दिसत आहे. एका पुरस्कार सोहळ्याला जाताना तिलं पेंट केलं होतं.

सोशलवर अदा नेहमीच सक्रिय असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळं अदा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्ड फोटो शेअर करायला तिला खूप आवडतं. बॉलिवूडमध्ये तिनं जास्त काम केलं नाही परंतु 1920 या सिनेमात तिनं केलेल्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

10 घेतला अ‍ॅक्ट्रेस होण्याचा निर्णय

अदाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तमिळ पलक्कड अय्यर कुटुंबातील आहे. परंतु ती मुंबईतच मोठी झाली आहे. 10 वीत असतानाच तिनं अ‍ॅक्ट्रेस होण्याचं ठरवलं होतं.

ऑडिशनमध्ये मिळायचा नकार

जेव्हा अदानं ऑडिशन देण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तिच्या कुरुळ्या केसांमुळे तिला खूपदा नकार मिळाला आहे. काहींना तर तिची उंचीही खटकत होती.

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं कमांडो 2, कमांडो 3, हंसी तो फंसी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. कमांडो 3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008 साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता.