COVID-19 : साऊथ अभिनेत्री ऐश्वर्या अर्जुनला ‘कोरोना’ची लागण ! पोस्ट शेअर करत सांगितलं

साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस ऐश्वर्या अर्जुन हिला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द ऐश्वर्यानंच यासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. चाहते आता तिच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

ऐश्वर्या अर्जुनला ‘कोरोना’ची लागण

ऐश्वर्यानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “अलीकडेच माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी आता होम क्वारंटाईन आहे. मेडिकलनं दिलेल्या सर्व सूचनांचं मी पालन करत आहे. अलीकडच्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी काळजी घ्या. सुरक्षित रहा आणि मास्क नक्की लावा. माझ्या चांगल्या आरोग्यसह मी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करेन.” ऐश्वर्याच्या या पोस्टनंतर तिला अनेक चाहत्यांचे मेसेज येण्यास सुरुवात झाली.

कोण आहे ऐश्वर्या अर्जुन ?

ऐश्वर्या अर्जुन ही तमिळ आणि तेलगूमधील दिग्गज अ‍ॅक्टर आणि फिल्ममेकर अर्जुन सरजा यांची मुलगी आहे. चाहते त्यांन अ‍ॅक्शन किंग असंही म्हणतात. ऐश्वर्याच्या आधी अर्जुन सरजा यांची पत्नी आणि पुतण्या ध्रुव सरजा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ऐश्वर्या दिवंगत अ‍ॅक्टर चिरंजीवी सरजाची कजिन आहे. 7 जून रोजी हार्ट अटॅकनं चिरंजीवीचं निधन झालं होतं.