Video : वाढदिवसानिमित्त अमीषा पटेलनं केली गरीब महिलांची मदत, वाटले सॅनेटरी नॅपकिन अन् मास्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अमीषा पटेल आज (मंगळवार दि 9 जून 2020) आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज तिनं काही चांगलं करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क आणि बिस्कीट यांचं वाटप केलं.

अमीषानं केली गरीब महिलांची मदत

अमीषानं इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत आणि याबाबत माहिती दिली आहे. फोटो शेअर करत अमीषा म्हणते, “देवाचे आभार की, त्यानं मला गरजू लोकांची मदत करण्याची संधी दिली. वुमेन रिस्पेक्ट फाऊंडेशन या एनजीओसोबत मिळून मी माझा बर्थ डे स्पेशल बनवत आहे.”

याआधीही अमीषानं एक व्हिडीओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं की, “वाढदिवस साजरा करण्याची सर्वात योग्य पद्धत स्लम एरियातील गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क आणि बिस्किट्स वाटले. भारताला सुरक्षित करण्याकडे एक पाऊल.”

अमीषानं केलेल्या कामाबद्दल सारेच तिचं कौतुक करत आहेत. अनेकांनी तिच्या या चांगल्या कामानंतर तिच्या पोस्टवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे.

अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर धमाकेदार पद्धतीनं आपल्या करिअरला सुरुवात करणारी अमीषा आता सिनेमात दिसत नाही. अनेक इव्हेंटमध्ये ती दिसत असते. अनेक फॅशन शोज आणि फॅशन ब्रँडला ती कनेक्टेड आहे. तिनं सिनेमात कमबॅक करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती फ्लॉप झाली. 2000 साली आलेल्या कहो ना प्यार है या सिनेमातून तिनं हृतिक रोशनसोबत डेब्यू केला होता.