Actress Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB पथक दाखल; चौकशीसाठी दिलं समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actress Ananya Pandey | ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण पथकाचे (NCB) अधिकारी आज (21 ऑक्टोबर) रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Pandey) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यावेळी अनन्या पांडेला समन्स देण्यात आले आहेत. असे समजते. आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबाबत चर्चा होती ती अनन्या पांडे होती. पंरतु, अजुन याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नाही. ड्रग्ज प्रकरणात (Drugs case) चौकशीसाठी अभिनेत्री पांडेला एनसीबीने आज हजर राहण्यास सांगितलं आहे.

 

अभिनेत्री अनन्या पांडे प्रख्यात अभिनेता चंकी पांडे (Actor Chunky Pandey) याची कन्या आहे. 2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. दरम्यान, अनन्या पांडे सोबत ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची (Aryan Khan) बहीण सुहाना खानचे (Suhana Khan) नाव देखील समोर आले आहे. अनन्या पांडेच्या (Actress Ananya Pandey) घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीचे पथक (NCB) आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच्या फायलींसह शाहरुख खानच्या मन्नत या निवासस्थानी पोहोचले आहे. त्या ठिकाणी शोध मोहिम सुरू आहे. असं एका वृत्तानुसार समजते. दरम्यान, शोध मोहिमीसाठी शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी पोहोचलेल्या एनसीबी पथकाचे (NCB) अनेक फोटो समोर आले आहेत.

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील क्रूझमधून अटक केली होती. या प्रकरणी आर्यन खान 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. बुधवारी आर्यन खानची जामीन याचिका मुंबई सेशन कोर्टाकडून (Mumbai Sessions Court) फेटाळण्यात आली आहे. तर, आज (गुरूवारी) वकिलांनी शाहरुखच्या मुलाच्या जामिनासाठी मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. यावरुन आता हाय कोर्टात जामीन अर्जावर आता 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

 

Web Title :- Actress Ananya Pandey | Ananya Panday Summoned By NCB: Know All About Actor Chunky Pandey’s Daughter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ ! शिरुरमधील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर भरदिवसा ‘सशस्त्र’ दरोडा; कोट्यावधीचं सोनं आणि रोकड लंपास (CCTV व्हिडीओ)

Narayan Rane on CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण