अभिनेत्री अनन्या पांडेनं शेअर केलं सौंदर्याचं ‘रहस्य’, घरीच ‘फेसपॅक’ कसा बनवाल हे सांगितलं !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमध्ये जर त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि उजळ करण्यासाठी तुम्ही जर एखाद्या फेसपॅकच्या शोधात असाल तर बॉलिवूड स्टार अनन्या पांडे तुमची मदतत करू शकते. 21 वर्षीय अनन्यानं नुकतंच तिची आई भावना पांडेच्या सौंदर्याचं सिक्रेट शेअर केलं होतं. यानंतर आता तिनं बाथरुमधील काही स्टोरीज शेअर केल्या आहेत ज्यात ती स्वत: बनवलेले फेस पॅक लावले आहेत.

अनन्यानं तिच्या फेस मास्कमध्ये त्या घरगुती वस्तूंचा वापर केला आहे ज्या सर्वांच्या किचनमध्ये मिळतात. यात हळद, दही आणि मध यांचा समावेश आहे. सोबतच तिनं या साऱ्यांची खासियतही सांगितली आहे. हा फेस मास्क तिनं 15 मिनिटांसाठी लावला होता.

या फेस मास्कमध्ये महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद. हळद अँटी इंफ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्त असते. हळद त्वचेची जळजळ कमी करते. यामुळं रंग उजळतो. अ‍ॅक्नेच्या खुणाही यानं निघून जातात. दही आणि मध त्वचेला थंडावा आणि ओलावा देतं. यामुळं त्वचा मऊ आणि निरोगी दिसते.

फेसपॅकच्या परिणामांबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, “जेव्हा मी हा फेस मास्क लावते तेव्हा माझी त्वचा एकदम ग्लो करू लागते आणि ताजीतवानी दिसते. हा फेस पॅक जास्त वेळ लावायला नाही पाहिजे. कारण यामुळं त्वचेवर पिवळेपणा दिसू शकतो. त्यामुळं यासाठी 10-15 मिनिटे खूप आहेत.” असं ती सांगते.

https://www.instagram.com/p/B8885FvBm6_/

https://www.instagram.com/p/B-i4K23lpkn/

https://www.instagram.com/p/B-MIGMMhzED/

https://www.instagram.com/p/B-n7pdYhvlP/

https://www.instagram.com/p/B-oKzx3AANn/

https://www.instagram.com/p/B-mezInBeFi/

https://www.instagram.com/p/B-lzcpvB47h/

https://www.instagram.com/p/B-jvOdAhu-O/

https://www.instagram.com/p/B-hJzf5JLVw/