IPL 2021: सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने पत्नीला केलं KISS, झहीर खानच्या पत्नीने शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL मधील काही क्षण Moments of the Season बनून जातात. असाचे काहीसा प्रकार गुरुवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पहायला मिळाला. फिरोजशहा कोटला मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या 14 व्या सीझनमधील 24 सामान झाला. या सामन्यात जहीर खानची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटके हिने हा क्षण तिच्या कॅमेऱ्यात टिपला. जहीर खानच्या पत्नीने या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. झाले असे की, मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यादरम्यान आपल्या पत्निला किस केलं. सूर्यकुमारचा हा रोमँटिक अंदाज झहिर खानच्या पत्नीने कॅमेऱ्यात टिपला.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्स संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामान्यात मुंबईने रोमहर्षक विजय मिळवला असला तरी सूर्यकुमारचा रोमँटिक अंदाज चांगलाच गाजला. सध्या सूर्यकुमार यादवच्या या फोटोची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. गुरुवारच्या सामन्यात त्याने फारसी चांगली कामगिरी केली नसली तरी त्याच्या रोमँटिक अंदाजामुळे तो चर्चेत आला.

सागरिकाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान या दोघांमध्ये एक काच असल्याचे या फोटोत दिसत आहे. तरी देखील खुल्लम खुल्ला प्यार करेंगे… या अंदाजात सूर्यकुमारने आपली पत्नी देवीका शेट्टीला किस करताना दिसत आहे. त्यांच्या मध्ये काचेचा अडथळा असताना तो आपल्या पत्नीला किस करत असल्याचे फोटोत दिसत आहे