लग्नाबाबत अंकिता लोखंडेने सोडले मौन, दिले ‘हे ‘उत्तर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच ‘मणिकर्णिका चित्रपटात झलकारीबाईंच्‍या रुपात दिसणार आहे. यापूर्वी तिच्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत राहिली आहे. गेल्‍या काही दिवसांमध्‍ये अंकिता लवकरच आपल्‍या बॉयफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार असल्‍याची चर्चा सुरू आहे. आता या चर्चेत नवे ट्‍विस्‍ट आले आहे. हा ट्‍विस्‍ट स्‍वत: अंकिता लोखंडेने आणला आहे. माध्‍यमांमध्‍ये अंकिता लोखंडेच्‍या लग्‍नाचा विषय चर्चिला जात असताना तिने खुद्‍द आपल्‍या लग्‍नाविषयी खुलासा केला आहे. सध्‍या लग्‍न करण्‍याचा कुठलाही विचार केलेला नाही, असे अंकिताने म्‍हटले आहे.
एका इंग्रजी  वृत्तपत्राला दिलेल्‍या माहितीनुसार, अंकिता लोखंडेने म्‍हटले आहे, ‘जर मी लग्‍न केले असते तर आपणास नक्‍कीच सांगितले असते. फक्‍त सांगणार नाही तर लग्‍नालाही नक्‍की बोलवेन. आता या विषयावर काही बोलणार नाही. कारण, आता माझा लग्‍न करण्‍याचा कोणताही प्लॅन नाही. मी आता केवळ माझ्‍या कामाकडे लक्ष देत आहे.’
झलकारीबाईंच्‍या रुपात अशी दिसते अंकिता लोखंडे 
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्‍यानंतर अंकिता लोखंडे सिंगल होती. नंतर अचानक बिजनसमॅन विकी जैनसोबत स्‍पॉट झाली. त्‍यामुळे चर्चांना उधाण आले. अंकिता लोखंडे-विकी जैन एकमेकांना डेट करत असल्‍याचे वृत्त समोर आले. परंतु, अंकिता लोखंडे किंवा विकी जैन यांनी आपल्‍या रिलेशनशीपबद्‍दल उघडपणे सांगितलेले नाही.
बॉलिवूडमध्‍ये पदार्पण
अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ती कंगना राणावतसोबत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’मध्‍ये दिसणार आहे.  या चित्रपटात ती झलकारी बाई यांची व्‍यक्‍तीरेखा साकारत आहे.  ‘मणिकर्णिका’ २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.