Actress Anurita Jha Intimate Scenes In Ashram 3 | वडिलांना विचारून दिले ‘आश्रम 3’ मध्ये इंटीमेट सीन, अभिनेत्रीने सांगितले घरात नंतर काय झालं

नवी दिल्ली : Actress Anurita Jha Intimate Scenes In Ashram 3 | बॉबी देओल (Bobby Deol) ची सक्सेसफुल वेब सिरीज 3 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player वर रिलीज होणार आहे. सिरीज रिलीज होण्याआधीच तिच्या स्टारकास्टची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री अनुरिता झा (Actress Anurita Jha) आश्रम 3 (Ashram 3) मध्ये तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. (Actress Anurita Jha Intimate Scenes In Ashram 3)

 

 अनुरिता झा

 

अनुरिता झा हिने आश्रम 3 मध्ये इंटिमेट सीन केले आहेत. याबद्दल एका मुलाखतीत अनुरिता झा हिने इंटिमेट सीनवर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांबद्दल सांगितले. तिने सांगितले की, तिचे वडील इंटिमेट सीनबद्दल खूप कूल होते. त्यांनी तिला हे सीन्स बिनधास्त होऊन करण्यास सांगितले. वडिलांची अशी प्रतिक्रिया बघून अनुरिता झा देखील रिलॅक्स झाली.

 

 अनुरिता झा

 

अनुरीताने HT ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मालिकेत इंटिमेट सीन करण्यापूर्वी तिने वडिलांना सांगितले होते. ती म्हणते- मी याबद्दल आधीच घरी सांगितले होते. मी पहिल्यांदाच एक इंटिमेट सीन केला आहे. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणाले – बाबा, रोल असा असेल. तो मी करावा का?

 

 अनुरिता झा

यावर त्याचे वडील म्हणाले – हो, हा, कर. बिनधास्त कर. वडिलांकडून परवानगी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने या भूमिकेसाठी होकार दिला. घरच्यांकडून प्रोत्साहन मिळालंय, आता सेटवरचं वातावरणाचा प्रश्न. अनुरीता झा हिने याबाबत सांगितले, तिच्या मते, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यामुळे सेटवरील वातावरण आरामदायक होते. (Actress Anurita Jha Intimate Scenes In Ashram 3)

 

 अनुरिता झा

 

अभिनेत्री म्हणाली- सेटवर फक्त 4-5 लोक होते. सीन करण्यापूर्वी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे भीती नव्हती. मात्र ते कसे करावे हे मला माहित नव्हते. जर मी ऑनस्क्रीन रडले असेल तर मला कसे रडायचे ते माहित आहे. पण इंटीमेट सीन कसे करायचे हे मला माहीत नव्हते.

 

 अनुरिता झा

 

Advt.

प्रकाश झा यांनी मला याबाबत काळजी करू नकोस, असा सल्ला दिला. सर्व काही ठिक होईल असे सांगितले. मला हे दृश्य अश्लील दिसू नये असे मला वाटत होते. मी बिहारची आहे. माझे कुटुंब साधे आहे. माझे फिल्मी बॅगराऊंड नाही.

 

मनात अनेक गोष्टी सुरू होत्या. अनुरिता झा हिने बॉबी देओलसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.
तिच्या मते, बॉबी देओल खूप स्वीट आणि कूल आहे.

 

 अनुरिता झा

आश्रम मालिकेनंतर लोक अनुरिता झा हिला ओळखू लागले आहेत.
हे यश ती खूप एन्जॉय करत आहे. अनुरिता झा ही 2012 मध्ये आलेल्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटात दिसली होती.
ती विनीत कुमारच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
बरसात पाहून मी त्यांची चाहती झाले होते. अभिनेत्रीने त्यांना आपले क्रश म्हटले.

 

 अनुरिता झा

 

आश्रम 3 एमएक्स प्लेयरवर 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे.
या मालिकेत ईशा गुप्ता, बॉबी देओलसह अनेक स्टार्स दिसणार आहेत.
आश्रम 3 मध्ये बॉबी देओल निराला बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे.
याचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.
या मालिकेचे पहिले दोन सीझन चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

 

Web Title :- Actress Anurita Jha Intimate Scenes In Ashram 3 | aashram 3 actress anurita jha on
filming intimate scenes bobby deol crush

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा