‘त्या’ अभिनेत्रीला लातूरहून अटक, तर एटीएसचा पीएसआय निलंबित

actress arrested in extortion case

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सहकलाकाराविरोधात दाखल केलेला गुन्हा मिटविण्यासाठी बोलवून सराईत गुंड व एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने त्याला १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकऱणी रोल नं १८ चित्रपटातील नटी रोहीणी माने हिला  गुन्हे शाखेच्या युनिट २ लातूरहून अटक केली़. मात्र एटीएसचा पीआयसने पोलिसांना गुंगारा दिला आहे. दरम्यान त्याला याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे याला पोलिसांनी अटक केली होती. तर रोहिणी मच्छिंद्र माने (रा़ नळदुर्ग, ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद), अभिनेत्री सारा श्रावण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (रा़ मुंबई, सध्या दुबई) आणि अमोल टेकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़. हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता़ याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा़ गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड) यांनी फिर्याद दिली होती़.

गुन्हे शाखेच्या पथकाला एटीएसचा पोलीस उपनिरीक्षक अमित टेकाळे हा लातूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लातूर येथे आपले पथक त्याच्या शोधार्थ रवाना केले. मात्र तो तेथून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी रोहिणी माने हिला तेथून अटक केली.

रोल नंबर १८ मध्ये सुभाष यादव व रोहिणी माने यांनी अभिनेता व अभिनेत्री म्हणून काम केले होते़ रोहिणी माने हिने सुभाष यादव विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी सुभाष यादवला त्यांनी राम जगदाळे याच्या कार्यालयात बोलावून घेतले व रोहिणीचे पाय धरायला लावून त्याचा व्हिडिओ काढला़ व त्यांच्या भावाकडून १ लाख रुपये घेतले़ त्यानंतर त्यांनी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली़. ती त्यांनी न दिल्याने दुबईतील सारा श्रवण हिच्या मार्फत तो व्हिडीओ व्हायरलकेल्. त्यानंतर सुभाष यादवने दिलेल्या फिर्यादीवरून तपास करून राम जगदाळे याला अटक केली. त्यानंतर आता रोहीणी माने हिला अटक करण्यात आली आहे. तर एटीएसचा पीएसआय अमोल टेकाळे हा फरार असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.