अभिनेत्री भूमी पेडणेकरनं ‘स्पॉटबॉय’ला केली आर्थिक मदत, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे एखादा सिनेमा नाही तर तिनं केलेली स्पॉटबॉयची मदत आहे. भूमीनं तिचे स्पॉटबॉय उपेंद्र सिंह यांना व्हॅनिटी व्हॅनच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत केली आहे. भूमीच्या या संवेदनशील स्वभावाचं सर्वांकडून कौतुक होताना दिसत आहे.

उपेंद्रला केलेल्या मदतीबद्दल बोलताना भूमी म्हणाली, “मी माझ्या करिअरची सुरुवात त्यांच्यासोबत केली. जेव्हा आम्ही सांड की आंख सिनेमाची शुटींग करत होतो. तेव्हा आम्ही व्हॅनिटीच्या व्यवसायाबाबत आमच्यात चर्चा झाली. नक्की कशी सुरुवात करायची हे त्यांना ठाऊक नव्हतं. मी त्यांना तसा विचार करण्यास प्रवृत्त केलं याशिवाय त्यांना आर्थिक मदतही केली.”

आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारी भूमी एक चांगली व्यक्ती देखील आहे. बॉलिवूडमध्ये इतरही अनेक असे कलाकार आहे जे आपल्या माणूसकीच्या स्वभावामुळे ओळखले जातात. सध्या सर्वांकडून भूमीचं कौतुक होताना दिसत आहे.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ती दुर्गावती या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. भूमी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. अलीकडेच सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. याशिवाय ती भूत सिनेमातही दिसणार आहे.