फक्त ‘या’ नियमाचं पालन करते भूमी पेडणेकर, ‘दम लगा के हईशा’ नंतर केलं होतं 32 किलो वजन कमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने कमी काळात प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. प्रत्येक चित्रपटात तिचा वेगळा लुक चाहत्यांना पहायला मिळाला आहे. तिने आपल्या फिटनेसने चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिने स्वतः ला खूप फिट ठेवले आहे. तिने आपल्या फिटनेसबाबतीत कधीही कोणत्याही आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेतला नाही तिने फक्त एकच नियम पाळला होता तो म्हणजे घरगुती जेवण..

नुकत्याच झालेल्या एका लाइव्ह कुकिंग सेशनमध्ये भूमी पोहचली होती. याबद्दल भूमी म्हणाली की, ‘मला पहिल्यांदा लाइव्ह कुकिंग सेशनला उपस्थित राहून खूप आनंद होतो आहे, कारण अन्न मला किती आनंद देतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. मी नेहमीच एक स्वस्थ मुलगी आहे आणि मला वैयक्तिकरित्या स्वयंपाक करणे आवडते आणि मी तूप, लोणी इत्यादी कधीही खाणे सोडले नाही. ‘

https://www.instagram.com/p/B6xgtlWpaEV/

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी रिफाइंड साखर खाणे टाळते आणि मी कार्बोहायड्रेट आहार देखील नियंत्रित ठेवते. त्याचबरोबर मी कधीही कोणत्याही आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेतला नाही. माझी आहारतज्ञ नेहमीच माझी आई असते. मी वजन कमी केल्यावर ‘होममेड फूड’ नियमाचे पालन करते, ज्याला आपण आपला मास्टरस्ट्रोक मानतो.’

भूमीच्या चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर तिने आगामी ‘दुर्गावती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. अशोक दुर्गावती याचे दिग्दर्शन करीत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, भूषण कुमार करत आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दुर्गावती ही दक्षिण अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या ‘भागमती’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटात अनुष्काने मुख्य भूमिका साकारली होती.