‘न्यूड’ फोटो लीक करण्याची धमकी, अभिनेत्रीनं दिलं ‘सडेतोड’ उत्तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिटनी कमिंग्स अमेरिकन अॅक्ट्रेस, कॉमेडियन आणि प्रोड्युसर आहे. द फीमेल ब्रेन आणि मेड ऑफ ऑनर यांसारखे सिनेमे तिने केले आहे. नुकताच व्हिटनीने तिचा एक टॉपलेस फोटो ट्विटरवरून शेअर केला होता. यासोबत तिने एक मेसेज पोस्ट केला आहे, यातून तिने सांगतिले आहे की, लोक तिला तिचा फोटो लीक करण्याची धमकी देत आहेत आणि ब्लॅकमेल करत आहेत.

काय आहे प्रकरण ?
यावर्षी व्हिटनीने इंस्टाग्रामवरील एका स्टोरीवर आपला एक फोटो ठेवला होता. यात तिचा एक ब्रेस्ट दिसत होता. जेव्हा तिला समजलं की, तिने चुकीचा फोटो पोस्ट केला आहे तिने हा फोटो डिलीट केला. परंतु तोपर्यंत स्टोरीचे स्क्रीनशॉट काढले गेले होते. या फोटोने तिला चार महिने ब्लॅकमेल करणं सुरु होतं. यानंतर 12 ऑगस्ट रोजी व्हिटनीने स्वत: हा फोटो ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. यासोबत तिने अनेक ट्विट केले आणि सांगितले की, कशा प्रकारे तिला धमकावलं जात होतं. फोटो लीक न करण्यासाठी तिला पैसे मागितले जात होते. काही जण तिला फोटो विकून पैसे कमावण्याची ऑफरही देत होते.

व्हिटनीने काय लिहिले ?
व्हिटनीने लिहिले की, “माझ्या एका फोटोने मला ब्लॅकमेल केलं जात आहे. काही लोक स्वत:ला हॅकर सांगत मला धमकी देत आहेत की, त्यांनी माझं क्लाऊड स्टोरेज हॅक केलं आहे. लोकांना वाटतं की, एखाद्या महिलेचा खासगी फोटो पोस्ट करून तिला खाली मान घालायला लावलं जाऊ शकतं. परंतु असं अजिबात नाही. मला धमकावणाऱ्यांची नावे मी यासाठी नाही सांगत कारण त्यात अनेकजण अल्पवयीन मुर्ख मुलं आहेत. जेव्हा एखादी महिला पब्लिक पर्सनॅलिटी  असते तेव्हा तिला धमकावणं सोपं असतं. याला निपटण्यासाठी पैसे, वेळ आणि ऊर्जा लावायला लागते. एक वकिल आणि एक सेक्युरिटी एक्सपर्ट हायर करावा लागतो. तुम्ही माझे ब्रेस्टर पाहू शकता परंतु माझा वेळ आणि पैसा बरबाद नाही करू शकत.

image.png

याआधी अमेरिकन मॉडेल आणि अॅक्ट्रेस बेला थोर्नलाही एकाने खासगी फोटो लीक करण्याची धमकी दिली होती. परंतु हॅकरच्या आधीच तिने स्वत:च आपला न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like