अभिनेत्री दीपाली सय्यदची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी सिनेअभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद या श्रीगोंदा मतदार संघातून मोर्चेबांधणी करीत आहेत. याचाच भाग म्हणून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३६ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाचा इशारा दिला आहे. या उपोषणात सदर गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याबाबत बोलताना सय्यद म्हणाल्या की, नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३६ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणीयोजनेवर राजकीय नेत्यांनी ५० वर्षे राजकारण केले. तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. साकळाई योजना मीच पूर्ण करेन. राज्य सरकारने यासंदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे क्रांती दिनापासून (दि. ९ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.

जनतेने जर संधी दिली तर विधानसभेत जायला आवडेल. शिवसंग्राम पक्षाची महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा असल्याने उमेदवारी मिळण्यासाठी अडचण येणार नाही, असे सांगत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले.


आरोग्यविषयक वृत्त –

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा  

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर