अहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो ! अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकी, आरोपी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगरला ये, तुझ्या सोबत हाथरसची पुनरावृत्ती करतो, अशी धमकी मराठी अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद हिला फोनवरून देण्यात आली होती. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन सोमवारी (दि.19) अहमदनगर येथून संदीप वाघ याला अटक केली आहे.

दीपालीला 4 ऑक्टोबर 2020 रोजी एका वाढदिवसाची पार्टी अटेंड करण्यास सांगण्यात आले होते. तिने 1 लाख रुपये मानधन असल्याचे सांगितले. तेव्हा 1 लाखात तु काय काय करणार ? अशी विचारणा करत नंतर फोनवरुन अश्लील संभाषण करण्यात आले. दीपालीने जाब विचारताच त्याने अर्वाच्च भाषेत वाद घातला. अहमदनगरला ये, भरचौकात तुझ्यासोबत हाथरसमध्ये 18 वर्षीय मुलीसोबत जो प्रकार घडला तोच घडेल, अशी धमकी दिल्याचे दीपालीने तक्रारीत म्हटले आहे.

दीपालीने 5 ऑक्टोबर रोजी रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी गुन्हा दाखल करुन घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी तपासाअंती आरोपीला अहमदनगर येथून बेड्या ठोकल्या

You might also like