‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  आताच्या काळात किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्स कॉमन झाले आहेत. परंतु सिनेमांच्या सुरुवातीच्या काळात बोल्ड किंवा किसिंग सीनची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांच्या जमान्यात एका अभिनेत्रीने एक किसींग सीन दिला होता. यानंतर सिनेसृष्टी पूर्णपणे बदलून गेली. यानंतरही यात काळानुसार अनेक बदल झाले आहेत.

1933 साली कर्मा हा सिनेमा रुपेरी पडद्यावर आला. यात अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशू राय यांनी काम केलं होतं. हा सिनेमा खूप हिट झाला. या सिनेमात देविका राणी यांनी पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. सिनेमातील या पहिल्या वहिल्या किसिंग सीनने तर धुमाकूळच घातला. तब्बल 4 मिनिटांचा हा किसिंग सीन होता. यानंतर देविका यांनी 35 वेळी किसिंग सीन दिला. हे सीन्स त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले. कर्मा हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत रिलीज झाला होता.

देविका यांच्या किसिंग सीननंतर अनेक अभिनेत्री किसिंग सीन देऊ लागल्या. परंतु देविका राणी आपल्या किसिंग सीनमुळे असा सीन देणाऱ्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या या किसिंग सीनची खूप चर्चा झाली.

 

Visit : Policenama.com