Video : पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार राणू मंडल ! ‘रामायणा’तील सीता दीपिकानं केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या रामायण (Ramayan) या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) हिनं सीतेची भूमिका साकारली होती, जी खूप गाजली होती. आता दीपिका लवकरच सरोजिनी नायडू या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील एक गाणं राणू मंडल (Ranu Mondal) गाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दीपिकानं तिच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओत राणू मंडलदेखील दिसत आहे. दीपिकानं ट्विटमध्ये लिहिलं की, माझा सिनेमा सरोजिनीमधील धीरज मिश्रा यांनी लिहिलेलं गाणं राणू मंडल गाणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आता राणू मंडल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

व्हिडिओ राणू मंडल यांनीही चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. सरोजिनी सिनेमातील गाणी ते गाणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा एकदा मला तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच ती एका सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारणार आहे. दीपिका आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये महिला गव्हर्नरचा रोल साकारणार आहे. सरोजिनी असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. यात दीपिका सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे.