अभिनेत्री दिशा पाटनीनं केला ‘बम बम टम टम’वर भन्नाट ‘डान्स’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. अलीकडेच तिनं एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-cGdEsg7qY/

दिशा पाटनीनं तिच्या इंस्टावरून तिचा एक डान्स व्हिडीओ शेअअर केला आहे जो चाहत्यांनाही खूप भावला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, दिशा बम बम टम टम या इंग्रजी गाण्यावर थिरकत आहे. दिशासोबत एक मेल पार्टनर आहे जो तिला मॅचिंग डान्स स्टेप करत आहे. दोघांचं कोऑर्डिनेशन साऱ्यांनाच आवडलं आहे. दिशाच्या दिलेखच आणि बोल्ड डान्स मुव्सनं तर चाहत्यांना पुन्हा पागल केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9EoTfdBbF0/

दिशाच्या लुकबद्दल सांगायचं झालं तर तिनं जीन्स घातली आहे. नेहमीप्रमाणंच तिनं आपल्या आउटफिटला बोल्डनेसचा तडका दिला आहे. दिशा आपल्या लुक आणि आउटफिटासाठीही खूप फेमस आहे. सध्या दिशाचा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. एकाच दिवसात हा व्हिडीओ 2.5 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

https://www.instagram.com/p/B7oQHRFBWkF/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. सध्या दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B7nnkPDhJ77/

https://www.instagram.com/p/B7iVSFthg74/

https://www.instagram.com/p/B527czzhuMQ/

https://www.instagram.com/p/B52fiFMhesh/

https://www.instagram.com/p/B4CTEGahJ45/

https://www.instagram.com/p/B3jqvyhlKRh/

https://www.instagram.com/p/Byaa121hT-e/

https://www.instagram.com/p/BvJ-eQBAxKy/

https://www.instagram.com/p/Bua-qFHAKcC/

https://www.instagram.com/p/BsVSs7NAaqK/

https://www.instagram.com/p/BsCjdvJA6-0/

https://www.instagram.com/p/Br0QxJLgJF5/