अभिनेत्री दिव्या खोसला कुमारनं साधला अरविंद केजरीवालांवर ‘निशाणा’ ! सोशल मीडियावार प्रचंड ‘वाद’

पोलीसनामा ऑनलाईन :फिल्मी स्टुडिओ टी सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हिनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचेही फॅन्स आमने सामने आले आहेत. काहीजण खुलून भाष्य करत दिव्याला सपोर्ट करताना दिसत आहेत तर काही लोक दिव्यावर आरोप करत आहेत की ती जाणून बुजून केजरीवालांवर निशाणा साधत आहे.

सध्या देशात लॉकडाऊन आहे. याचा परिणाम मजूरांवर आणि रोज कमावून खाणाऱ्या लोकांचे जास्त हाल होताना दिसत आहेत. दिल्लीतून सलग मजूरांच्या पलायनाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. आनंद विहार बस स्टेशनवर हजारोंच्या संख्येत लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे. सध्या सोशल डिस्टेंसिंगसाठी सरकारकडून आवाहन केलं जात आहे. परंतु इतं मात्र काही वेगळीच स्थिती दिसत आहे.

अशात आरोप लावले जात आहेत की, दिल्लीत मजूरांची मदत करण्यासाठी दिल्ली सरकार आवश्यक ती भूमिका निभावत नाहीये. हा मुद्दा पुढे करत अॅक्ट्रेस, डायरेक्टर दिव्या खोसला कुमार हिनं अरविंद केजरीवाल यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. ट्विट करत दिव्या म्हणते, “एक वैतागलेला नागरिक म्हणून मी अरविंद केजरीवाल यांना विचारू इच्छिते की, अशा कठिण काळात जेव्हा पूर्ण देशाला फंडाची आवश्यकता आहे अशा काळात ते न्यूज चॅनलवर खासगी जाहिरातींसाठी एवढे पैसे कसे खर्च करू शकतात ?”

यानंतर सोशल मीडियावर एकच वाद सुरू झाला. काहींनी थेट केजरीवालांवर हल्लाबोल केला. काहींनी तर असंही म्हटलं की, केजरीवाल युपी बिहारच्या लोकांच्याबात पक्षपात करत आहेत आणि त्यांना जाणून बुजून बाहेर पाठवत आहेत.

काहींनी तर दिव्यावर आरोप केले आहेत की, ती कोणाच्या तरी सांगण्यावरून असं करत आहे का. किंवा ती फक्त केजरीवालांवरच निशाणा साधत आहेत का. कारण पलायन तर अनेक ठिकाणांहून होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like