‘रामायण’चा हिस्सा होती अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, व्हायरल होतोय ‘हा’ खास फोटो

पोलीसनामा ऑनलाईन :टीव्हीवरील प्रसिद्ध शो रामायणमधील अनेक चेहरे असे आहेत जे प्रेक्षकांच्या मनात बसले आहेत. या ग्रंथावर आजवर अनेक शो तयार झाले आहेत. तरीही लहान पडद्यावरील असाच एक लोकप्रिय चेहरा आहे तो म्हणजे दिव्यांका त्रिपाठी हिचा. तिनं ये हैं मोहब्बतें मालिकेत डॉ. इशिताचा रोल केला आहे. दिव्यांकानं 2012 मध्ये रामायणच्या रिमेकमध्ये काम केलं होतं. दूरदर्शनवर जुना रामायण शो सुरू झाल्यानंतर आता नव्या रामायणमधील दिव्यांकाच्या रोलचा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

image.png

ज्या रामायण मालिकेत दिव्यांकानं काम केलं होतं त्यात गगन मलिक यानं राम आणि नेहा सरगम हिनं साीतेची भूमिका साकारली होती. दिव्यांकाच्या रोलबद्दल बोलायचं झालं तर ती एका खास रोलमध्ये दिसली आहे. तिचा रोल अशा अप्सरेचा होता जिच्या वेशात चंद्र देवानं स्वत:ला लपवलं होतं. ही मालिका तब्बल एक वर्ष चालली. याचे एकूण 56 एपिसोड आले होते.

लॉकडाऊनमुळं सध्या 80 आणि 90 दशकातील अनेक फेमस टीव्ही शो रिपीट टेलिकास्ट होताना दिसत आहेत. रामानंद सागर यांची रामायण आणि बी आर चोपडा यांची महाभारत ही मालिका जास्त पाहिली जाताना दिसत आहे. रिपीट टेलिकास्टच्या 4 एपिसोडमध्ये रामायण या मालिकेला 170 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. यानं टीआरपीचे सारेच रेकॉर्ड तोडले आहेत.