Photos : भयंकर ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री, नंतर म्हणाली -‘इतका तमाशा कशासाठी ? बिकिनी घालणारी मी काही…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्ट (Donal Bisht) हिनं अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. परंतु यामुळं ती प्रचंड ट्रोल झाली. याचं कारण म्हणजे तिचे बिकिनीतील फोटो. बिकिनी घातल्यानं अनेकांनी तिच्यावर नको त्या शब्दात कमेंट केली. काहींनी अश्लील आणि अभद्र शब्दांचाही वापर केला आणि तिच्यावर टीका केली. परंतु तिनंही जशात तसं उत्तर दिलं आहे.

डोनलनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. डोनल म्हणते, कपड्यांवरून कुठल्याही महिलेचं चरित्र ठरवलं जाऊ शकत नाही. जज करायचं असेल तर कपड्यांवरून नाही तर वागणुकीवरून करा.

डोनल पुढं म्हणते, मला आवडतात, तेच कपडे मी घालणार. याच्याशी लोकांना काहीही देणंघेणं नाही. माझ्या कपड्यांवरून माझ्यावर अश्लील कमेंट करणारे स्वत: किती नीच आहेत हेच यावरून दिसत आहे.

डोनल असंही म्हणाली की, बिकिनी घालणारी मी काही जगातील पहिली महिला नाही. मग इतका तमाशा कशाला करता ? असा सवालही तिनं केला आहे. ती म्हणते, माझी आई अनेकदा ट्रोलर्सच्या कमेंटमुळं अस्वस्थ होते आणि मला अनेक फोटो डिलीट करायला सांगते. परंतु माझं काम लक्षात घेता अनेकदा मला अश्लील कमेंटकडे दुर्लक्ष करावं लागतं. मी चांगलं तेच घेण्याचा प्रयत्न करते.

डोनल म्हणाली, मला वादात रहायला आवडत नाही. परंतु मला निष्कारण वादात गोवलं जातं, जसं आज झालंय. कधी कधी लोकं मर्यादा ओलांडतात. म्हणून मी बोलतेय. जर तुम्ही हे थांबवलं नाही तर मला सायबर क्राईम डीपार्मेंटची मदत घ्यावी लागेल.

डोनलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती द सोचो प्रोजेक्ट या आगामी वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. डोनलनं 2014 साली आलेल्या एअर लाईन्स या मालिकेतून रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं कलश- एक विश्वास, एक दीवाना था, रूप- मर्द का नया स्वरूप, दिल तो हॅप्पी है जी, एक दीवाना था, लाल इश्क अशा अनेक मालिकेत काम केलं. ती एक मॉडेलही आहे.