Corona च्या सावटात यावेळी ‘अशी’ असणार गौहर खानची ईद ! ‘लॉकडाऊन’बद्दल म्हणाली ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  आज (सोमवार दि 25 मे) सर्वत्र ईद साजरी केली जात आहे. परंतु ही ईद नेहमीसारखी नसणार आहे. कोणी कोणाच्या घरी जाणार येणार नाही. असं असलं तरी अभिनेत्री गौहर खान या ईदसाठी तेवढीच उत्साही आहे जेवढी ती मागच्या ईदला होती. ती म्हणते की, ईद प्रेम आणि आनंद वाटण्याचा सण आहे, असं काहीसं ज्याची सध्या खूप गरज आहे जेव्हा लोक कॉविड 19 महामारीसोबत लढत आहेत.

‘रमजान प्रार्थना करण्याची वेळ’
गौहर खान म्हणते, रमजान प्रार्थना करण्याची वेळ आहे आणि आपण हे लक्षात ठेवायला हवं कारण आपण ईद साजरी करतो. मी ते म्हणत हे ज्यामुळं लोकांच्या आयुष्यात बदल घडेल. गरजू लोकांना मदत करण्यासाठी इतर लोकही सोबत येत आहेत. अनेक लोक आपले मित्र आणि कुटुंबाशिवाय ईद साजरी करत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की, ही वेळीही जाईल.

यावेळी मुंबईतच ईद साजरी करणार गौहर
गौहर म्हणाली, “उत्सव साजरा करताना लोकांच्या समाजिक सुरक्षिततेचंही ध्यान ठेवायला हवं आणि लॉकडाऊनच्या नियमांना तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. सर्वकाही पहिल्यासारखं सामान्य झालेलं नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसऱ्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं आपण घरातच रहायला हवं आणि जबाबदारीनं उत्सव साजरा करायला पाहिजे.”गौहर तिच्या आईसोबत मुंबईत ईद साजरी करणार आहे तर तिचं पूर्ण कुटुंब सध्या भारतात नाहीये.

View this post on Instagram

Ready Steady Go …. 🙋🏻‍♀️💙

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

गौहर खान म्हणते, यावेळी कोणीच पाहुणे नसतील तर मी फक्त बिर्याणी आणी शीर खुरमा बनवेन. माझी खूप छान बनवते त्यामुळं बिर्याणी ती बनवेन आणि मी शीर खुरमा. मी नेहमी घर सजवत असते. यावेळी मात्र साधेपणाने ईद साजरी करणार आहे. यावेळी मी नवीन कपडेही खरेदी केलेले नाहीत. मी काहीच ऑर्डर केलेलं नाही.

View this post on Instagram

Tu chal main aayi ….. 🤍

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

View this post on Instagram

ISHQ ❤️..

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

View this post on Instagram

Laugh off your Worries …. ✨

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like