‘लाल दुपट्टे वाली’ गाण्यानं रातो-रात ‘स्टार’ बनवलं, पतीच्या आजारामुळं सोडलं ‘करिअर’, आज करतेय ‘हे’ काम

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – 90 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक प्रसिद्ध कलाकार होते, परंतु त्यापैकी काही कलाकार हिट चित्रपट दिल्यानंतर इंडस्ट्रीतून गायब झाले, काही कलाकारांनी आपल्या कुटुंबासाठी करिअर सोडले. त्यापैकी एक म्हणजे 90 च्या दशकातील अभिनेत्री रितु शिवपुरी. ‘आंखें’ चित्रपटातील ‘लाल दुपट्टे वाली’ हे गाणे तुम्हाला माहित आहे. या चित्रपटातून रितू स्टार बनली. या चित्रपटामध्ये रितूसोबत चंकी पांडे आणि गोविंदा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर रितु शिवपुरीने बरेच चित्रपट केले पण सर्व चित्रपटात ती सहायक भूमिकेत दिसली. तिच्या काळात रितू बोल्ड अभिनेत्री म्हणून चर्चेत होती.

बरीच वर्षे चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर 2006 मध्ये रितूने बॉलिवूड इंडस्ट्रीला निरोप दिला, त्यानंतर ही अभिनेत्री तिच्या विवाहित जीवनात रमली. त्याकाळात तिने इंडस्ट्रीत परत येण्याचा प्रयत्न केला, परंतु पती आजारी असल्यामुळे तिने याकडे दुर्लक्ष केले. खरं तर, रितूच्या नवऱ्याला मागच्या भागात ट्यूमर होता, ज्यामुळे तिला करियरपेक्षा पतीची काळजी महत्वाची वाटली. 2014 मध्ये एका मुलाखतीत रितूने तिच्या पुनरागमनविषयी म्हटले होते की, 2006 मध्ये जेव्हा ती पंजाबी चित्रपटासाठी 18 ते 20 तास काम करून घरी जायची तेव्हा तिचा नवरा झोपलेला असायचा.

त्यावेळी ती आपल्या पतीला वेळ देऊ शकत नव्हती, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिला असे वाटले की तिच्या कारकीर्दीत तिच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. ती म्हणाली होती की, ‘माझा नवरा एक अतिशय साधा माणूस आहे, त्याने या गोष्टीबद्दल माझ्याकडे कधीही तक्रार केली नाही, परंतु या गोष्टीने मी अस्वस्थ झाले आणि मग मी अभिनय सोडून कुटुंबाला काही वर्षे देण्याचे ठरविले.’

तिने चित्रपटापासून ब्रेक घेतला पण आपले टॅलेन्ट वाया जाऊ दिले नाही. त्यानंतर तिनी ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करण्यास सुरवात केली. रितू तिची आई सुधा शिवपुरी यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे स्वप्न बघते. काही वर्षांपूर्वी तिने टीव्हीवर पुनरागमन केले होते आणि अनिल कपूरच्या शो 24 मधील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. यानंतर टीव्ही शो ‘इज प्यार को क्या नाम दूं’ च्या दुसर्‍या सीझनमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली. ती आधी जितकी सुंदर दिसत होती त्यापेक्षा अधिक ती सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –