Insta Fitness Dose : गुल पनागनं साडी परिधान करून मारले पुशअप्स, पहा हा मोटिव्हेटिंग व्हिडिओ

नवी दिल्ली : हेल्थ आणि फिटनेस मेन्टेन ठेवणे खुप जरूरी आहे आणि जर तुम्ही एक सेलिब्रिटी असाल तर ते खुपच जरूरी असते. परंतु अनेकदा घराच्या बाहेर असणे, कामात बिझी असणे किंवा ट्रॅव्हलिंगमुळे वर्कआऊट करणे अवघड होते. परंतु काही लोक असे सुद्धा असतात, जे कोणत्याही स्थितीत आपले रूटीन ब्रेक करत नाहीत, ते काहीही करून एक्सरसाइज करण्याचा मार्ग शोधून काढतात. नुकतेच अ‍ॅक्ट्रेस गुल पनागने सुद्धा आपल्या एक्सरसाइज एक व्हिडिओ शेयर केला आहे, तो पाहून अनेक लोकांचे डोळे उघडले आहेत.

बॉलीवुड अभिनेत्री गुल पनाग आपल्या फिटनेसबाबत खुप सजग असते. ती सध्या सोशल मीडियावर सुद्धा खुप अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक वर्कआऊट व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओत ती एका सेटवर साडीत पुश अप्स मारताना दिसत आहे. साडी परिधान केलेली असताना सुद्धा ती सहजपणे वर्कआऊट करत आहे. गुल पनागने हा व्हिडिओ शेयर करत कॅपशनमध्ये लिहिले आहे की, कधीही, कुठेही. गुलचे हा गुण पाहून फॅन्ससुद्धा हैराण आहेत.

काय आहेत पुश अप्सचे फायदे
पुश अप्समुळे अ‍ॅब्स, खांदे, छाती आणि ट्रायसेप्सला मजबूती मिळते. ही अपर बॉडीसाठी बेस्ट एक्सरसाइजपेकी एक आहे. यामुळे मांसपेशी मजबूत होतात. वजन नियंत्रणात राहते, कमरेचे दुखणे दूर होते. पुश अप्स मसल्सला टोन्ड करते आणि स्ट्रेंथ वाढवते.

You might also like