अभिनेत्री खा. हेमा मालिनी पुन्हा झाल्या ‘वधू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ईशा देओलची आई हेमा मालिनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत हेमा मालिनी नव्या नवरीच्या म्हणजेच वधूच्या लुकमध्ये दिसत आहे. हा फोटो इतका व्हायरल झाला आहे की, हा फोटो आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. हा फोटो ईशा देओलने शेअर केला आहे. ईशा दुसऱ्यांदा आई बनली आहे. यानतंर तिच्या दुसऱ्या मुलीचा हेमा मालिनी सोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. ईशाने आपली आई हेमा मालिनी यांचा क्युट फोटो शेअर केला आहे.

खरेतर हेमा मालिनी यांच्या या फोटोसाठी फिल्टर वापरण्यात आला आहे. कॅमेऱ्यात आजकाल अनेक प्रकारचे फिल्टर असतात. या फिल्टरला बॉलिवूड कलाकारही वापरत आहेत असे दिसत आहे. फिल्टरचा वापर करूनच ईशाने आपल्या आईला नवरीचा लुक दिला आहे. या फोटोत हेमा मालिनी यांनी डोक्यावर पदर, बिंदी, टिकली, नेकलेस, कानांमध्ये इयर रिंग्ज आणि नथ अशा लुकमध्ये दिसत आहे. काजळ घातलेल्या तिच्या डोळ्यांचा आकारही खूप मोठा दिसत आहे. पिंक कलरची लिपस्टिक आणि लाल टिकलीमुळे  हेमा मालिनी यांचं सौंदर्य आणखीच खुललं आहे.

ईशाने हेमा मालिनी यांचा फोटो शेअर करत एक खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ईशा म्हणते की, “माझ्या आईला त्या अ‍ॅपचा वापर करायला खूप आवडतं ज्यात अनेक वेगळे अवतार करू शकते आणि हा फोटो कामाला जाण्याच्या बरोबर आधीच काढला आहे.”

आरोग्यविषयक वृत्त –

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम

लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

‘हे’ उपाय केल्याने नियंत्रणात राहील रक्तदाब