अभिनेत्री हिना खानचा ‘नागिन 4’ मालिकेबद्दल मोठा ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाईन :टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत येत असते. सध्या देशात लॉकडाऊन असला तरी हिना खान सोशलवर अ‍ॅक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना खाननं नागिन 4 या मालिकेबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे.

एका मुलाखीतीत बोलताना हिना खाननं खुलासा केला आहे की, तिला नागिन 4 या मालिकेची ऑफर आली होती. परंतु तिनं ही ऑफर नाकारली. अस असलं तरी तिनं यामागील कारणही स्पष्ट केलं आहे. हिना खान म्हणाली, “मला नागिन 4 मध्ये काम करण्यासाठी ऑफर मिळाली होती. त्यावेळी काही जुळून आलं नाही त्यामुळं शोसाठी नकार दिला होता. मला माझ्या 11 वर्षांच्या करिअरच्या काळात अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत अनेक चढ-उतार आले. कधी कधी तर इच्छा असूनही एखाद्या शोमध्ये काम करता येत नाही.” असंही हिना म्हणाली.

हिना खान पुढे म्हणाली, “भलेही मी नागिनमध्ये काम केलं नसेल. परंतु याचा मला अजिबात पस्तावा नाही. हो परंतु जर मला पुढील सीजनमध्ये म्हणजेच नागिन 5 मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेनं.”

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डॅमेज 2 या सीरीजमध्ये तिनं काम केलं आहे. याशिवाय तिनं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.  याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांना आवडली होती.