‘लॉकडाऊन’मध्ये अभिनेत्री ईशा गुप्तानं कंफर्म केलं ‘रिलेशनशिप’ ! फोटो शेअर करत सांगितलं ‘आयसोलेशन’मध्ये बॉयफ्रेंड

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील बोल्ड अभनेत्री ईशा गुप्ता हिनं खासगी आयुष्याबद्दल इंस्टाग्रामवरून खूप खास असा एक खुलासा केला आहे ज्यामुळं ती सध्या चर्चेत आली आहे. ईशानं स्पॅनिश बिजनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअल कंपोस ग्वालर (Manuel Campo Guallar)सोबत नात्यात असल्याचं कंफर्म केलं आहे. ईशानं दोघांचा एक खास फोटो शेअर केला आहे ज्याला खास असं कॅप्शनही दिलं आहे.

https://www.instagram.com/p/B_ehXaagzOx/?utm_source=ig_embed

ईशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती मॅन्युअलसोबत उभी असल्याचं दिसत आहे. खास बात अशी की, ईशानं लिहिलेलं कॅप्शनही स्पॅनिशमध्ये आहे. ईशा म्हणते, ते अमो मचो मी चोर. याचा अर्थ असा होतो की, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.

https://www.instagram.com/p/B_WpnLIJ5BB/

ईशानं जसा हा फोटो सोशलवर शेअर केला तसा क्षणातच व्हायरल होताना दिसला. अनेक चाहत्यांनी जोडीचं कौतुकाही केलं. काही चाहत्यांनी फोटोला लाईक केलं तर काहींनी कमेंट करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/B-bzbDdJJXD/

ईशानं एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं होतं की, “तो (बॉयफ्रेंड) आता आयसोलेशनमध्ये(स्पेनमध्ये) आहे. मी त्याच्याशी रोज कॉलवर बोलत असते. तो खूप शांत आहे. मी अशा स्थितीत लवकर पॅनिक झाले असते.” असंही ती म्हणते.

https://www.instagram.com/p/B9EArEhJSNu/

https://www.instagram.com/p/B88bgoPphNf/

https://www.instagram.com/p/B8oD5feJFxo/

https://www.instagram.com/p/B5C66ufgAw4/

https://www.instagram.com/p/B25_TTCg-TK/