Actress Jamuna Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वयाच्या 86 व्या वर्षी राहत्या घरी निधन

पोलीसनामा ऑनलाईन : Actress Jamuna Passed Away | आज पहाटे लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री जमुना यांचं वृद्धापकाळाने हैदराबाद येथे राहत्या घरी निधन झाले आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. यामुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी आपल्या कारकिर्दीत तेलगू, हिंदी, कन्नडा, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. जमुना (Actress Jamuna Passed Away) यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला होता. 1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्समा’ या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली होती. जमुना यांच्या निधनानंतर अनेक सिनेकलाकारांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जमुना या अभिनयासोबत राजकारणातदेखील सक्रिय होत्या.
त्या 1989 सालच्या निवडणुकीत आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. एन ती रामा राव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. जमुना (Actress Januma Passed Away) यांनी 1952 सालच्या ‘पट्टिल्लू’, ‘तेनाली रामकृष्णा’, ‘गुंडम्मा कथा’, ‘कलेक्टर जानकी, श्री कृष्णा तुलाबाराम’ आणि ‘पुलरंगाडू’ यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

जमुना यांच्या मृत्यूवर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू याने श्रद्धांजली वाहिली आहे.
‘जमुना गरु यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले.
त्यांच्या सर्व प्रतिष्ठित भूमिकांसाठी आणि इंडस्ट्रीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना नमन.
त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मी शोक व्यक्त करतो असे ट्विट करत महेश बाबू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title :- Actress Jamuna Passed Away | veteran actress Jamuna passed away at 86

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR