अभिनेत्री काम्या पंजाबी ‘क्वारंटाईन’मध्ये पतीकडून करून घेतेय ‘हे’ कम

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. आम असो किंवा खास सर्वांनाच घरात वेळ घालवावा लागत आहे. सर्व शुटींग बंद असल्यां सध्या कलाकाराही घरात वेळ घालवत आहेत. सध्या अभिनेत्री काम्या पंजाबी देखील आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारीत तिचं दुसरं लग्न झालं आहे. काम्याचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती पतीकडून हेड मसाज करून घेताना दिसत आहे.

काम्यानं नुकताच तिचा एक फोटो इंस्टावरून शेअर केला आहे. यात ती पतीसोबत क्वारंटाईम पीरियड स्पेंड करताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की काम्या पती शलभ डांगकडून हेड मसाज घेत आहे. फोटो शेअर करताना काम्या म्हणते, “तेलमालिश.” काम्याचा हा फोटो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काम्यानं तिचे काही रोमँटीक फोटोही इंस्टावर शेअर केले होते ज्यात पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसली होती.

अभिनेत्री नीना गुप्ताचाही पतीकडून अशा प्रकारे हेड मसाज करून घेतानाचा फोटो समोर आला होता. फोटो शेअर करताना नीना म्हणाली होती, “पतीचा वापर करो ना.” नीनाचाही हा फोटो खूप व्हायरल झाला होता. यानंतर आता काम्याचा फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.