Video : पत्रकार परिषदेदरम्यानच पत्रकारावर ‘भडकली’ कंगना रनौत ; म्हणाली, कसं लिहीता एवढं ‘वाईट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा जजमेंटल है क्या हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमामुळे कंगना गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील गाण्याचा लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कंगनाचे एका पत्रकारासोबत जोरदार भांडण झाले. पत्रकाराने तिला प्रश्न विचारताना आपलं नाव सांगताक्षणी कंगना त्याच्यावर खूप भडकली. तिने त्याच्यावर अनेक आरोप केले.

नेमकं काय झालं ?

कंगनाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचे नाव जस्टिन राव असून पीटीआय या वृत्तसंस्थेचा तो पत्रकार आहे. जेव्हा जस्टीन रावने तिला प्रश्न विचारण्यासाठी आपले नाव सांगितले तेव्हा अचानक कंगनाला तिच्याबद्दलची मणिकर्णिका या सिनेमावेळीची एक बातमी आठवली. ती बातमी कंगानाविरोधात असल्याने ती चांगलीच भडकली. तिचा राग अनावर झाल्याने तिने त्याचा अपमान करण्यास सुरुवात झाली. मणिकर्णिका सिनेमाविरोधात जाणीवपूर्वक लिहिले शिवाय तिच्याविरोधात खोट्या गोष्टी ट्विट केल्या असे तिने म्हटले.

During an event today in Bombay, the way #KanganaRanaut tried to intimidate one of the most honest and genuine entertainment journalist Justin Rao for no fault of his, was extremely in bad taste, disgusting and shameful to say the least.

Geplaatst door Ravi Jain op Zondag 7 juli 2019

काय म्हणाली कंगना

कंगना म्हणली की, “जस्टिन राव मणिकर्णिका संबंधित एका मुलाखतीदरम्यान माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास होता. माझ्यासोबत त्याने जेवणही केलं. तरीही त्याने माझा चित्रपट मणिकर्णिका विरोधात वाईट गोष्टी लिहिल्या. त्याने मला मेसेजही केला होता.”

image.png

जस्टिन रावचे प्रत्युत्तर

कंगानाच्या आरोपानंतर जस्टिनने हे सर्व आरोप फेटाळत म्हटले की, “तू माझ्यावर आरोप करू शकत नाही. पत्रकार जे काही लिहितात, ते सत्य असतं. मी तुझ्याविरोधात कधीही काहीही वाईट लिहिलेलं नाही. मी तुझ्या सोबत कधीच जेवण केलं नाही. तुझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही तीन तास नव्हतो.” एवढेच बोलून जस्टिन शांत बसला नाही. त्याने त्याच्या ट्विटचे आणि मेसेजचे स्क्रिनशॉट पाठवण्याचेही आव्हान केले. तिने नंतर शेअर करेन असे म्हटले.

image.png

होस्टची मध्यस्थी

कंगना आणि पत्रकाराची जुंपली असताना होस्टने मध्यस्थी करत पत्रकाराला गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका पत्रकाराने त्याचा चांगलाच समाचार घेतला. “कंगन आणि जस्टिन बोलत आहेत तू दोघांमध्ये बोलू नकोस.” असा सल्ला देत होस्टलाच गप्प केले.

कंगना आणि पत्रकाराचा वाद झाल्यानंतर चित्रपटाची निर्माती एकता कपूरने मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. साँग लाँचिंग सोहळ्याला एकता कपूरसह, राजकुमार राव, लेखिका कनिका ढिल्लन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवलामुडीही स्टेजवर उपस्थित होते.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

You might also like