अभिनेत्री करिश्मा तन्नाला योगा करताना दुखापत, करावी लागली ‘ही’ सर्जरी !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीचा शो खतरों के खिलाडी 10 मध्ये दिसली होती. लॉकडाऊनमध्ये आता तिला दुखापत झाल्याचं समजत आहे. ही दुखापत एवढी जास्त होती की, तिला पायाच्या अंगठ्यायची सर्जरी करावी लागली होती. तिनं चाहत्यांसोबत सर्जरीचा एक फोटोही शेअर केला होता आणि झोप येत नाही असं त्या फोटोवर लिहिलं होतं.

एका इंग्रीज वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी योगा करताना काही नवीन योगासन करतेवेळी करिश्मा तन्नला दुखापत झाली होती. तिचा बॅलन्स गेल्यानं तिला इजा झाली होती. तिच्या पायाला आणि खांद्याला थोडं लागलं होतं. तिच्या अंगठ्याला ड्रेसिंग दिसलं होतं. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1257272288879226881?s=20

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसलीआहे. याशिवाय 2018 साली आलेला संजय दत्तचा बायोपिक संजू मध्ये ती दिसली होती. तिने नागिन 3 या मालिकेतही काम केलं आहे. याशिवाय स्टार प्लसवरील कयामत की रात या प्रसिद्ध मालिकेतही करिश्मानं काम केलं आहे. 2013 साली आलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. मालिकांबद्दल बोलायचं झालं तर क्योंकी सास भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस मे निकला होगा चाँद, शरारत, कुसूम असा अनेक मालिकेत तिनं काम केलं आहे.