‘चहा-बिस्कीट’ वाटून अभिनेत्री करिश्मानं शेअर केला फोटो ! युजर म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन लागू झालेला आहे. सर्व काही ठप्प झालं आहे. यामुळं काही गरीब लोकांचे खूप हाल होताना दिसत आहेत. असं असताना आता प्रत्येक नागरिक एकत्र येत गरजूंना मदत करताना दिसत आहे.

खतरों के खिलाडी 10 ची स्पर्धक अभिनेत्री करिश्मा तन्ना हीदेखील गरजूंना मदत करताना दिसत आहे. तिनं बिल्डींगच्या स्टाफची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि बिल्डींगच्या सिक्योरिटी स्टाफला तिनं चहा बिस्कीटं दिलं. तिनं इंस्टावर स्टाफसोबत फोटोही पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना करिश्मा म्हणाली, “आमच्या बिल्डींगच्या सोसायटी स्टाफला चहा बिस्कीट आणि ब्रेड सर्व केले.”

करिश्मानं इतरांना अपील केलं की, त्यांनी लोकांची मदत करावी. आपण एकत्र येऊन लढूयात असंही ती म्हणाली. आपण इतरांना मदत करायला हवी. मी याची सुरुवात केली आहे आता आपण सारे मिळून या मिशनला पुढे नेऊ असंही तिनं सांगितलं.

करिश्माचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसथ आहे. काहींनी तिला हा फोटो काढल्याबद्दल ट्रोल केले आहे. एकानं कमेंट केली की, आम्हीही आमच्या बिल्डींगच्या सिक्योरिटीची 4 वेळा मदत केली. परंतु आम्ही त्याचे फोटो क्लिक करून अपलोड नाही केले. काहींनी तिला सोशल मीडियावर डिस्टेंसिंगवरून प्रश्न विचारला आहे. काहींनी तिला म्हटलं की, तुझं मास्क कुठे आहे.

View this post on Instagram

Wassup??? . #sunday #mood #love #beach #instagram

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like