अभिनेत्री करिश्मा तन्नानं शेअर केला तिच्या पहिल्या ऑडिशनचा ‘भीतीदायक’ अनुभव !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री करिश्मा तन्ना अलीकडेच रोहित शेट्टीचा शो खतरों के खिलाडी 10 मध्ये दिसली होती. सध्या लॉकडाऊनमुळं घरात असणाऱ्या करिश्मानं अलीकडेच एक मुलाखत दिली. यात तिनं तिच्या पहिल्या ऑडिशनचा अनुभव सांगितला आहे. तो अनुभव खूप भयानक असल्याचं तिनं सांगितलं आहे.

करिश्मानं 2001 सााली आलेल्या एकता कपूरच्या क्योंकि कभी सास भी कभी बहू थी या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. त्या दिवसांच्या ऑडिशनची मेमेरीज शेअर करताना करिश्मा म्हणाली, “जेव्हा मी कॉलेजात होते तेव्हा मी पोर्ट फोलिओ तयार केला होता. तेव्हा मी मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा विचार करत होते. तिनं अनेक ठिकाणी पोर्ट फोलिओ पाठवला होता. दोन तीन आठवड्यातच मला एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्मचा कॉल आला.”

करिश्मा म्हणाली, “त्यावेळी मी खूप नर्वस होते. मला फक्त एवढंच माहिती होतं की रोल कॅमेरा, अ‍ॅक्शन म्हटल्यानंतर डायलॉग बोलायचा असतो. मी कॅमेरा फेस करताना डायरेक्टरची मदती मागितली.”

करिश्मा सांगते, बालाजीसाठी दिलेलं माझं पहिलं ऑडिशन खूपच भीतीदायक होतं. मी अनेकदा अडखळले. खूपच घाण होतं ते ऑडिशन. तरीही माझं सिलेक्शन झालं होतं. एकता कपूर मॅम डायलॉग्स नाही पहात. त्या फक्त हे पाहतात की, अ‍ॅक्टर त्या रोलसाठी किती फिट आहे. मी बहुतेक त्या रोलसाठी फिट होते म्हणून मी सिलेक्ट झाले.