जीम आणि फिटनेस क्लब बंद ! कॅटरीना कैफनं शोधला फिट राहण्याचा नवा मार्ग (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाची दहशत पाहता सरकारनं शाळा, कॉलेज आणि जीम तसेच क्लब बंद ठेवण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळं आता फिटनेसची खास काळजी घेणारे बॉलिवूड स्टार फिटनेससाठी नवीन मार्ग शोधून काढताना दिसत आहेत. अभिनेत्री कॅटरीना कैफनं तिच्या इंस्टावरून नुकतेच काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत कॅट तिच्या घराच्या टेरेसवर वर्कआऊट करताना दिसत आहे. घरीच फिट राहण्यासाठी काय करावं हे तिनं सांगितलं आहे.

कॅटनं तिच्या इंस्टावरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत तिनं सांगितलं आहे की, कशा प्रकारे फक्त 20 मिनिटे घरीच वर्कआऊट करत स्वत:ला फिट ठेवता येतं. पहिल्या व्हिडीओत कॅटरीना स्क्वॉट्स करताना दिसत आहे. पुशअप्स पासून तर माऊंटेन क्लाईंबरपर्यंत ती आपल्या ट्रेनरसोबत अनेक प्रकारच्या एक्सरसाईज करताना दिसत आहे.

कॅटरीनाचे हे वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कॅटच्या अनेक चाहत्यांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. आणि त्यावर कमेंटही केल्या आहेत. काही तासांतच तब्बल 1.3 मिलियन लोकांनी तिचे हे वर्कआऊट व्हिडीओ पाहिले आहेत. तब्बल 7 हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहे. अजूनही तिचे हे वर्कआऊट व्हिडीओ पाहिले जाताना दिसत आहेत.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B90OPjth8ZN/

https://www.instagram.com/p/B9zhsKWBNBp/

https://www.instagram.com/p/B9zRFbapPUj/

https://www.instagram.com/p/B9zRCfCpFgm/

https://www.instagram.com/p/B9zQ5PPpgtt/

https://www.instagram.com/p/B9xCRXiHRun/

https://www.instagram.com/p/B9vtOICJLdQ/