अभिनेत्री कविता कौशिकनं शेअर केले पतीसोबतच ‘रोमँटीक’ एक्सरसाईजचे फोटो ! म्हणाली- ‘Strrrrrrrrrretch’

पोलिसनामा ऑनलाइन –एफआयआर या टीव्ही मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कविता कौशिक फिटनेस फ्रिक आहे. कविता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आता कविताचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत ती पती रोनित बिस्वास सोबत काही रोमँटीक फोटो शेअर केले आहेत ज्यात कविता बॉडी स्ट्रेच करताना दिसत आहे.

कवितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती रोनित सोबत स्ट्रेचिंग एक्सरसाईज करताना दिसत आहे. दोघांचा रोमँटीक अंदाज पाहण्यासारखा आहे. फोटो शेअर करताना कविताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये कविता म्हणते, “Strrrrrrrrrretch.” सध्या कविताचे पतीसोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कविता आपली फिट बॉडी आणि हेल्दी लाईफचे सिक्रेट सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या फ्लेक्सिबल बॉडीमुळे कविता अनेक प्रकारच्या डान्स स्टाईल आणि स्टेप्स अगदी सहज करते. कविता यासाठी सर्टिफिकेटही मिळवलं आहे. ती सध्या पतीला एक्सरसाईज शिकवत आहे.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कविताने कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.