सिध्दार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी ?, अभिनेत्री म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी समाज माध्यमात प्रचंड सक्रिय असते. समाज माध्यमात व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती काय चर्चेत असते. आता ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रामुळे चर्चेत आली आहे. कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असून दोघे लवकरच लग्न करतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, त्या दोघांनी या नात्याला अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही.

View this post on Instagram

📸 @avigowariker @makeupbylekha @bbhiral

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

सध्या कियारा तिच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तिला विचारले की, तू सिंगल आहे की नाही? त्यावर गंमतीशीरपणे उत्तर देताना कियाराने सांगितले की, “मी लग्न करेपर्यंत सिंगल आहे. मी अजून लग्न केलेलं नाही, म्हणुनच सिंगल आहे.”

View this post on Instagram

Making the most of every sunset ☀️

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियारा आणि सिद्धार्थ लवकरच ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र दिसतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. सिद्धार्थने त्याचे सीन्स शूट करण्याची सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कियाराने समाज माध्यमाद्वारे आपल्या फॅन्ससोबत लाइव्ह सेशन केले होते. तेव्हा सिद्धार्थने छोटीशी एन्ट्री केली होती. त्यावेळी सिद्धार्तने कियाराचे कौतुक करत, ती खूप सुंदर दिसते आहे आणि तिला आपला ‘मरजावां’ चित्रपट पाहण्यास सांगितले होते. कियाराने सिद्धार्थाचे आभार मानलेले.

You might also like