Actress Kriti Verma GST Job | जीएसटी विभागातील नोकरी सोडून अभिनेत्री झालेली कृती वर्मा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी; ED कडून कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actress Kriti Verma GST Job | जीएसटी विभागातील नोकरी सोडून अभिनय क्षेत्राकडे वळालेली बिग बॉस फेम अभिनेत्री कृती वर्मा हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्री कृती वर्माच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. फसव्या टीडीएस परतावा प्रकरणात तिच्यावर आरोप करण्यात आला असून हा घोटाळा तब्बल 264 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये जीएसटी निरीक्षक-अभिनेत्री कृती वर्मासह तिचा प्रियकर व्यावसायिक भूषण पाटील, माजी आयकर निरीक्षक तानाजी अधिकारी आणि इतर अनेकांवर आरोप करण्यात आले आहेत. (Actress Kriti Verma GST Job)

ईडीने या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये डझनभराहून अधिक आरोपींची नावे लिहिली आहेत. फसवणुकीने मिळवलेले पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ईडीने या प्रकरणात 266 कोटी रुपयांची मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू जप्त करु गोठवल्या होत्या. गुन्ह्याच्या उर्वरित रकमेचा तपास अद्याप सुरु आहे. (Actress Kriti Verma GST Job)

यावर अभिनेत्री कृती वर्मा हिने आऱोप फेटाळले आहेत. फसवणुकीचा प्रकार घडल्याच्या तीन वर्षांहून अधिक काळानंतर, 2020 मध्ये आपण भूषण पाटीलच्या आयुष्यात आल्याचे सांगून कृती वर्माने फसवणूक केल्याचा आरोप फेटाळला आहे. तानाजी अधिकारीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा देखील तिने दावा केला. कृती वर्मा हिने बिग बॉस, रोडीज एक्स्ट्रीम यासारख्या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. कृती ही भूषण पाटीलसह रिलेशनशीपमध्ये आहे. भूषण आणि तानाजी अधिकारी या प्रकरणात प्रमुख आरोपी आहेत.

Advt.

या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने सांगितले की, बेकायदेशीरपणे कमावलेला बरासचा पैसा भूषण पाटील
यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आला. तर काही रक्कम ही कृती वर्माच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी
वापरण्यात आली. या केसमध्ये प्रमुख आरोपी असलेला तानाजी अधिकारी हा आयकर कार्यालयात
वरिष्ठ कर सहाय्यक पादवर होता. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स
शोधून काढली आणि या गुन्हांमध्ये सहभागी झाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ