20 वर्षांपूर्वी ‘मिस युनिव्हर्स’ बनली होती अभिनेत्री लारा दत्ता ! स्पेशल फोटो शेअर करत दिला आठवणींना ‘उजाळा’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार लारा दत्तानं 2000 साली मिस युनिव्हर्ससाठी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिनं हा किताब आपल्या नावावरही केला होता. आता या गोष्टीला 12 मे रोजी 20 वर्षे झाली आहेत. लारानं त्यावेळचे काही खास फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. एका फोटोत तिच्या डोक्यावर क्राऊनही दिसत आहे.

लारानं तिच्या इंस्टावरून मिस युनिव्हर्सदरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. फोटो शेअर करताना लारा म्हणते, “12 मे 2000, निकोसिया, सायप्रस, युनिव्हर्सकडू किती सुंदर भेट मिळाली. मी फेमिना इंडिया आणि मिस युनिव्हर्सची यासाठी कायम आभारी आहे.” भारताकडून मिस युनिव्हर्स बनणारी लारा दुसरी आहे. तिच्या आधी सुष्मितानंही हा किताब आपल्या नावावर केला होता.

लाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालंत मिस युनिव्हर्स बनल्यानंतर तिनं 2003 साली आलेल्या अंदाज सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. गेल्या काही दिवसांपासून ती सिनेमांपासून दूर होती. हॉट स्टारची वेब सीरिज हंड्रेडमधून तिनं पुन्हा वापसी केली आहे जी अलीकडेच रिलीज झाली आहे. हा तिचा डिजिटल डेब्यूदेखील होता. या सीरिजमध्ये तिच्या सैराट फेम रिंकु राजगुरूदेखील काम करताना दिसली.

View this post on Instagram

👑 A bevy of beauties! From left to right: Sushmita Sen – Miss Universe 1994 Priyanka Chopra – Miss World 2000 Lara Dutta – Miss Universe 2000 Yukta Mookey – Miss World 1999 Dia Mirza – Miss Asia Pacific 2000 Diana Hayden – Miss World 1997 Aishwarya Rai – Miss World 1994 @sushmitasen47 @priyankachopra @larabhupathi @yuktamookhey @diamirzaofficial @dianahaydensays @aishwaryaraibachchan_arb #missasiapacific #missworld #missuniverse #missindia #missfeminaindia #femina #beautypageant #beautyqueen #beautyqueens #laradutta #laraduttabhupathi #diamirza #diamirzaofficial #priyankachopra #priyankachoprajonas #priyankachoprafans #priyankachopra_nour #priyankachoprateam #aishwaryarai #aishwaryaraibachan #aishwarya #aish #aishwaryaraibachchan #sushmitasen #sushmitasenfanclub #sushmitasen47 #yuktamookhey #dianahayden #missworld1994 #missuniverse1994

A post shared by @ retrobollywood on

सुरु झाला फेमिना मिस इंडियाचा प्रवास

ज्यांना लाराप्रमाणे मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स बनायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फेमिना मिस इंडिया 2020 साठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. असं म्हटलं जात आहे यावेळी ऑनलाईन ऑडिशन होण्याची शक्यता आहे. अलीकडेच मिस आफ्रिकेचं आयोजनही ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला आहे.