‘महेश भट्टच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन, ड्रग्ज कनेक्शनचीही माहिती,’ ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ड्रग्ज (Bollywood Drug Connection) कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक मोठी नावं समोर आलं ज्यांची एनसीबीनं चौकशी केली. आता एका अभिनेत्रीनं डायरेक्टर महेश भट (Mahesh Bhatt) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. महेश भटच फिल्म इंड्स्ट्रीतील डॉन आहेत आणि त्यांना ड्रग्ज कनेक्शनबाबत संपूर्ण माहिती आहे असा खळबळजनक आरोप अभिनेत्री लवीना लोध (Luviena Lodh) हिनं केला आहे.

महेश भट यांचा भाचा सुमित सभरवाल (Sumit Sabharwal) याच्यासोबत लवीनानं लग्न केलं आहे. तो ड्रग्ज सप्लाय करायचा असा दावा तिनं केला आहे. याची माहिती महेश भट यांनाही आहे असंही ती म्हणाली आहे. तिनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

लवीनानं सांगितलं की, “मी महेश भट यांचा भाचा सुमित सुभरवालशी लग्न केलं होतं. त्याच्याविरोधात मी घटस्फोटाचा अर्ज केला आहे. कारण तो सपना पब्बी (Sapna Pabbi), अमायरा दस्तूर (Amyra Dastur) सारख्या अभिनेत्रींना ड्रग्स सप्लाय करतो हे मला समजलं. या सर्वाची माहिती महेश भट यांना आहे. महेश भट या इंडस्ट्रीतले सर्वात मोठे डॉन आहेत आणि ते ही पूर्ण सिस्टीम ऑपरेट करतात. जर तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागला नाहीत तर ते तुमचं जगणं मुश्किल करतात. महेश भट यांनी किती तरी लोकांना कामावरून काढून त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. ते फक्त एक फोन करतात आणि लोकांची नोकरी जाते.” असंही ती म्हणाली आहे.

लवीना पुढं म्हणाली, “आता मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर ते माझ्या घरात घुसण्याचा आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पोलीस ठाण्यात एनसी करायला जाते तेव्हा कुणीच माझी एनसी घेत नाही आणि घेतली तरी त्यावर कारवाई होत नाही. जर माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही घडलं तर त्याला महेश भट, मुकेश भट (Mukesh Bhatt), सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील. बंद दरवाजामागे हे लोक काय करतात हे लोकांना माहिती तर हवं. कारण महेश भट खूप शक्तीशाली आणि प्रभावशाली आहेत.

दरम्यान महेश भट यांच्या अधिकृत टीमनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महेश भट यांच्या टीमनं म्हटलं आहे की, लवीना लोधनं महेश भट यांच्यावर व्हिडीओतून जे काही आरोप केले ते आम्ही फेटाळत आहोत. हे आरोप चुकीचे आहेत आणि महेश भट यांची बदनामी केली जात आहे. कायद्यानं हे गंभीर आरोप आहेत याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करू.”

लवीनानं 2010 साली हिमेश रेशमिया सोबत कजरारे सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमाचं डायरेक्शन महेश भट आणि पूजा भट यांनी केलं होतं.

You might also like