अभिनेत्री माही विजने दिली GOOD NEWS, पती जय म्हणाला पहिलं PRODUCTION

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज अनेकांचे फेवरेट कपल आहे. सध्या माही विज आणि जय दोघेही चर्चेत आले आहे. कारण माही विजने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आई होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

लवकरच माही आई होणार आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तसेच ट्विट करत ही माहिती दिली आहे. माही सध्या खूपच खुश आहे. दोघांनीही ही आनंदाची बतामी हटके पद्धतीने सोशलवर शेअर केली आहे. यात चर्चा होत आहे ती म्हणजे जयच्या पोस्टची कारण त्याने आपल्या होणारा बाळाचा उल्लेखच प्रॉडक्शन असा केला आहे.

जय आणि माही दोघांनीही ट्विटर आणि इंस्टावरून माही प्रेग्नंट असल्याची माहिती दिली आहे. हातात हात घेतलेला एकच फोटो दोघांनी शेअर केला आहे दोघांच्या समोर त्यांनी जन्माचे साल लिहिले आहे आणि त्यांच्या बाजूला 2019 लिहून कमिंग सून असं म्हटलं आहे. दोघांनीही हटके पोस्ट लिहिली आहे. जयच्या फोटोच्या कॅप्शनची जास्त चर्चा होताना दिसत आहे.

जयने एकच फोटो सर्वत्र शेअर केला आहे. मात्र कॅप्शन खूपच हटके दिलं आहे. माहीने आनंदाची बातमी दिल्यामुळे तिचे आभार मानत आपल्या कॅप्शनमध्ये जय म्हणतो की, “9 महिने वेदना, पण आयुष्यभर फायदा. 9 महिने आजारपण, पण आयुष्यभर आनंद. 9 महिन्याची गर्भधारणा, आपल्या वारसाची सुरुवात. 2019 मध्ये होणाऱ्या आपल्या दोघांच्या पहिल्या प्रॉडक्शनची घोषणा केल्याबद्दल धन्यवाद माही.”

दरम्यान बालिका वधू , नच बलिये सीजन 8 मध्ये माहीने काम केले आहे. लागी तुझसे लगन या मालिकेतून माही विशेष प्रकाशझोतात आली आहे. जय भानुशाली देखील अनेक सिरियल आणि सिनेमात काम केले आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Mahhi Jay❤️bhanushali (@mahhivij) on

 

You might also like