हैद्राबाद रेप केस : अभिनेत्री मल्लिका शेरावतनं दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैद्राबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि जाळून तिची हत्या झाल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे जनता संतप्त आहे. असे असताना बॉलिवूड कलाकारांनीही आपला राग व्यक्त केला आहे. बॉलिवूड स्टार मल्लिका शेरावत हिनंही राग व्यक्त केला आहे आणि बालात्कार थांबले पाहिजेत असं म्हटलं आहे. मल्लिकानं याबाबत पोस्टर शेअर केली आहे.

मल्लिका शेरावतनं तिचा एक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांबाबत आणि हैद्राबादमधील रेप केसबद्दल राग व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिच्या फोटोवर तिनं स्टॉप रेप अशी टेक्स्ट लिहली आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “Stop Rape now‼️End Rape culture. #hyderabadrapecase #justiceforpriyankareddy #womensrights #justice #humanrights” हैद्राबाद पीडितेला न्याय मिळावा अशी आशाही मल्लिकानं व्यक्त केली आहे. तसेच रेप होणं थांबायला हवं असंही तिनं म्हटलं आहे. मल्लिका सध्या सिनेमांपासून दूर असली तरी सोशलवर मात्र ती नेहमीच सक्रिय असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like